चर्चेत राहिलेले राठोड यांची अमरावतीत नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:20 IST2021-01-23T04:20:55+5:302021-01-23T04:20:55+5:30
राठोड यांची नांदेड येथून बदली झाल्यानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी नगर येथे पदभार स्वीकारला होता. त्यांनी स्वतंत्र पथक स्थापन ...

चर्चेत राहिलेले राठोड यांची अमरावतीत नियुक्ती
राठोड यांची नांदेड येथून बदली झाल्यानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी नगर येथे पदभार स्वीकारला होता. त्यांनी स्वतंत्र पथक स्थापन करून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध धंद्यांवर छापासत्र सुरू केले होते. त्यांच्या पथकाने नगर शहरात बनावट डिझेलवर केलेली कारवाई चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. ही कारवाई करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. दरम्यान, राठोड हे एका कॉन्स्टेबलसोबत आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा करत असल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिपही चांगलाच चर्चेचा विषय ठरली. याच दरम्यान राठोड यांची शासनाने नगरमधून तडकाफडकी बदली केली. बदलीनंतर राठोड यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी मॅटमध्ये तक्रार केली होती. मॅटच्या आदेशानुसार शासनाने त्यांना नियुक्ती दिली आहे. दरम्यान, राठोड यांच्या व्हायरल क्लिपची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून चाैकशी सुरू आहे.