निंबोडीच्या संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 11:28 IST2017-08-29T11:18:14+5:302017-08-29T11:28:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  अहमदनगर :   नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पडून तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्याने गावकरी संतप्त ...

Rastaroko of Angry Birds of Lemonade | निंबोडीच्या संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको 

निंबोडीच्या संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको 

ठळक मुद्देशाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यूअवघ्या वीस वर्षात कोसळली इमारतग्रामस्थ आक्रमकदोषींवर कारवाईची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : 

 नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पडून तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्याने गावकरी संतप्त झाले असून आज सकाळी त्यांनी रास्ता रोकोस सुरुवात केली. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांसह ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.  यामध्ये शिवसेना दक्षिण प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनश्याम शेलार सहभागी झाले आहेत.

नगर तालुक्यातील निंबोडी येथे जिल्हा परिषदेची इमारत काल कोसळली. त्यामध्ये सुमारे ३५ विद्यार्थी अडकले होते़. या घटनेत तीन विद्यार्थ्यांना मृत्यू झाला. गावक-यांनी मदत कार्य हाती घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या दरम्यान आपत्ती व्यवस्थापनची यंत्रणाही कुचकामी ठरली. इमारत बांधून २० वर्र्षांचाच कालावधी लोटल्याने इमारत पडली कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्व कारणांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून आज सकाळीच रास्तारोको केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीसरात तणावपूर्ण शांतता आहे. 

Web Title: Rastaroko of Angry Birds of Lemonade