रासप महापालिका निवडणूक ताकदीने लढणार : महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 21:18 IST2017-09-25T21:17:30+5:302017-09-25T21:18:14+5:30
नगर शहरात आगामी महापालिका व जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढणार असून, उमेदवारांना पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व दुग्धविकास-पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले़

रासप महापालिका निवडणूक ताकदीने लढणार : महादेव जानकर
अहमदनगर : नगर शहरात आगामी महापालिका व जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढणार असून, उमेदवारांना पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व दुग्धविकास-पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले़
शहरातील गुलमोहर रोड येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या सोमवारी जिल्हा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होत़ यावेळी पक्षाचे महासचिव बाळासाहेब तोडतले, सुमंतबापू हंबीर, नगरचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष ताजुद्दीन मुनियार आदी उपस्थित होते़
जानकर म्हणाले, नगरमधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सभासद नोंदणी व विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत़ तसेच पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे़ आधी नगरसाठी खूप वेळ दिला, पण अपेक्षित असे यश मिळाले नाही़ आता पक्षविस्ताराचे जोमाने काम करणार असल्याचे जानकर म्हणाले़ यावेळी पाटील, हंबीर यांनी मनोगत व्यक्त केले़
कार्यक्रमाला पक्षाचे दक्षिण लोकसभाध्यक्ष संजय बाचकर, संतोष गलांडे, युवा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कोकरे, तालुकाध्यक्ष पोपट गुलदगड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़