राष्ट्रीय जन मंच पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार

By | Updated: December 5, 2020 04:40 IST2020-12-05T04:40:35+5:302020-12-05T04:40:35+5:30

राष्ट्रीय जन मंच (सेक्युलर) पक्षाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिर्डी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ...

Rashtriya Jan Manch Party will contest elections on its own | राष्ट्रीय जन मंच पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार

राष्ट्रीय जन मंच पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार

राष्ट्रीय जन मंच (सेक्युलर) पक्षाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिर्डी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कैलास कोळसे, प्रदेशाध्यक्ष अविनाश झेंडे, उपाध्यक्ष बाळासाहेब गिधाड, प्रदेश महासचिव भगवानराव जर्हाड, प्रदेश कोषाध्यक्ष प्रकाश थोरात, सचिव संदीप लांडगे, युवक प्रदेशाध्यक्ष सचिन देशमुख आदी उपस्थित होते.

बाचकर म्हणाले, राष्ट्रीय जन मंच पक्ष हा महाराष्ट्रासह बिहार, गुजरात, पश्चिम बंगला उत्तर प्रदेश आदी राज्यांत विस्तारला आहे. या राज्याचे प्रभारीसुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. कार्यक्रमात कैलास कोळसे, प्रकाश थोरात, प्रतापराव पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, नितीन थोरात, साहेबराव रासकर, विजय कुटे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रदेश महासचिव भगवानराव जऱ्हाड यांनी प्रास्ताविक केले. युवक प्रदेशाध्यक्ष सचिन देशमुख यांनी आभार मानले.

Web Title: Rashtriya Jan Manch Party will contest elections on its own