राशीनकरांनी शांतता पाळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 00:51 IST2016-10-15T00:28:24+5:302016-10-15T00:51:59+5:30
कर्जत : राशीनकरांनी शांतता पाळावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले.

राशीनकरांनी शांतता पाळावी
कर्जत : राशीनकरांनी शांतता पाळावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले.
राशीनमध्ये दोन गटांत भांडणे होऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर राशीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कर्जतमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे,अनंत भोईटे, पोलीस निरीक्षक अंकुश इंगळे, शिवाजी गवारे व महसूल अधिकारी हजर होते. राशीनमध्ये दोन गटांत भांडणे झाल्यानंतर याप्रकरणी कर्जत पोलिसात वेगवेगळे चार गुन्हे दाखल केले आहेत. राशीनचा तणाव पूर्णपणे निवळला आहे. ज्या व्यक्ती प्रत्यक्ष वादात होत्या, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. जातीय तेढ निर्माण होइल, असे काही वर्तन कोणी करू नये, असे आवाहन जाधव यांनी केले. बैठकीला कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके. भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मोढळे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, गणेश कदम, राहुल नवले, शाहूराजे भोसले, रिपाइंचे नेते अशोक गायकवाड, विजय वाकचौरे, अंकुश भैलुमे, अजय साळवे, तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, रामकिसन साळवे, रोहन कदम, सोमनाथ भैलुमे आदी हजर होते.