शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

पाथर्डीत डॉक्टरकडून १० लाखांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 10:39 IST

दोन माध्यमिक शिक्षक, एक शिक्षणसंस्था संस्थाचालक व एक राजकीय पदाधिकारी अशा चौघांवर गुन्हा दाखल

पाथर्डी (जि. अहमदनगर): शहरातील कोविड हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरला त्यांच्या हॉस्पिटलची बदनामी थांबवण्यासाठी १० लाखांची खंडणी मागणाऱ्या खरवंडी परिसरातील दोन माध्यमिक शिक्षक, एक शिक्षणसंस्था संस्थाचालक व एक राजकीय पदाधिकारी अशा चौघा आरोपी विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

फिर्यादी डॉ. विनोद त्रिंबक गर्जे यांनी पाथर्डी शहरात कोविड हॉस्पिटल चालवण्या संदर्भात रीतसर परवाना घेतलेला असून सर्व प्रशासकीय माहिती पंचायत कार्यालयात सादर केलेली आहे, अशी परिस्थिती असतांना शैलेंद्र जायभाय याने डॉ. नवनाथ आव्हाड,  अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी यांचे कडे माहिती अधिकारा अंतर्गत गर्जे हॉस्पिटलची माहिती मागवली होती. सदरील माहिती डॉ. गर्जे यांनी परस्पर जायभाय यास कळवण्यास लेखी पत्राने सांगितले होते. परंतु शैलेंद्र जायभाय व नवनाथ उगलमुगले यांनी डॉ. गर्जे यांना डॉ. आव्हाड यांचे समोर दिनांक १४ जानेवारी रोजी १० लाखांची खंडणी मागितली व रक्कम न् दिल्यास पेपरमध्ये हॉस्पिटलच्या बातम्या देवून बदनामी करत हॉस्पिटल बंद पडण्याची धमकी दिली होती. त्यानंतर डॉ. विनोद गर्जे हे खरवंडी येथे कार्यक्रमानिमित्त २५ जानेवारी रोजी गेली असता  मिथुन डोंगरे यांने मध्यस्थी करत बदनामी टाळण्यासाठी तडजोडी करत पुन्हा चार लाखांची खंडणी मागितली. तडजोडीअंती तीन लाख खंडणी देण्याचे ठरले. 

सरकारी पंचासमक्ष शैलेंद्र प्रल्हाद जायभाये (रा. खरवंडी ता.पाथर्डी), मिथुन दगडू डोंगरे (रा.जवळवाडी ता.पाथर्डी), मच्छिन्द्र राधाकिसन आठरे (रा.शआनंदनगर,पाथर्डी)  यांना खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली स.पो.नी प्रवीण पाटील,पो.स.ई सचिन रणशेवरे,श्रीकांत डांगे,पो.ना.अनिल बडे, देविदास तांदळे, राहुल तिकोने, राम सोनवणे यांच्या पथकाने तनपुरवाडी शिवारात छापा टाकून रंगेहात पकडले. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी शैलेंद्र जायभाय व मिथुन डोंगरे हे वॅग्नोर गाडीतून पळून गेले. परंतु आरोपी मच्छिद्र राधाकिसन आठरे यास पोलिसांना पकडण्यात यश आले. असून शैलेंद्र प्रल्हाद जायभाये ( रा. खरवंडी ता. पाथर्डी), मिथुन दगडू डोंगरे (रा. जवळवाडी ता.पाथर्डी) , नवनाथ उगलमुगले (रा. काटेवाडी ता.पाथर्डी), मछीन्द्र राधाकिसन आठरे (रा. आनंदनगर,पाथर्डी) यांच्या विरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपीमध्ये माध्यमिक शिक्षक, शिक्षणसंस्था संस्थाचालक,राजकीय पदाधिकारी यांचा समावेश असल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोपींनी आणखी किती लोकांकडून खंडणी उकळली याचा पोलीस शोध घेत आहेत.