व्दारकामाई वृद्धाश्रमात रंगपंचमीला आनंदाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST2021-04-04T04:21:58+5:302021-04-04T04:21:58+5:30

आरोग्य विभागाने या वृद्धांचे लसीकरण केले. तर निड फॉर निडी चळवळ चालवणाऱ्या साईश गोंदकर याने वृद्धांबरोबर रंगपंचमी साजरी केली. ...

Rangpanchami at Vdarakamai Old Age Home | व्दारकामाई वृद्धाश्रमात रंगपंचमीला आनंदाची उधळण

व्दारकामाई वृद्धाश्रमात रंगपंचमीला आनंदाची उधळण

आरोग्य विभागाने या वृद्धांचे लसीकरण केले. तर निड फॉर निडी चळवळ चालवणाऱ्या साईश गोंदकर याने वृद्धांबरोबर रंगपंचमी साजरी केली.

श्रीनिवास रेड्डी व सुधा रेड्डी येथे अत्यंत सेवाभावी पद्धतीने वृद्धाश्रम चालवतात. या आश्रमात शंभरहून अधिक वृद्ध आहेत. डोऱ्हाळे आरोग्य केंद्राचे डॉ. संजय गायकवाड यांनी रंगपंचमीच्या दिवशी वृद्धाश्रमात जाऊन या वृद्धांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला. निड फॉन निडी चळवळ उभी करणारा विद्यार्थी साईश विनोद गोंदकर याने वृद्धांबरोबर रंगपंचमी साजरी केली. साईश शहरी भागातील नागरिकांकडून वह्या, पेन, कपडे, शालेय साहित्य गोळा करून ग्रामीण भागातील गरजू व गरीब मुलांना वाटत असतो. रेश्मा गोंदकर यांनी आपल्या वाढदिवशी साईशला दीडशे वह्या व पेन भेट दिले होते. भीमराज थोरात यांनी वृद्धांच्या समोर प्रवचन केले.

०३ शिर्डी

Web Title: Rangpanchami at Vdarakamai Old Age Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.