येळपणेत रंगला नवउद्योजकांचा सन्मान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:18+5:302020-12-13T04:36:18+5:30
काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील डीएसपी प्रतिष्ठाणने गावातील नवउद्योजकांना उद्योजकता विकास पुरस्काराने सन्मानित केले. ‘आजचा युवक उद्याचा उद्योजक’ ...

येळपणेत रंगला नवउद्योजकांचा सन्मान सोहळा
काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील डीएसपी प्रतिष्ठाणने गावातील नवउद्योजकांना उद्योजकता विकास पुरस्काराने सन्मानित केले.
‘आजचा युवक उद्याचा उद्योजक’ या विषयावर मार्गदर्शन केले.
मल्ल आणि शेतकऱ्यांचे नाव होते; पण गावातील अनेक तरुणांनी शिक्षण घेऊन छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे गावच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळू लागले आहे.
तेरा उद्योग यशस्वीपणे चालविणारे आकाश गोंदावले यांनी उद्योगाची पायाभरणी कशी करावी. तो उद्योग कसा विस्तारित करावा याची माहिती दिली. बालाजी जाधव यांनी ग्रामीण भागातील तरुणांनी भांडवल कसे उभारावे, याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजक सतीश धावडे म्हणाले, जीवनात अडचणी आहेत. त्यावर मात करण्याची तयारी ठेवली तर माणूस कोणत्याही क्षेत्रात यशाचे शिखर सर करू शकतो.
यावेळी नवनाथ देवकर, भाऊसाहेब ठाणगे, वाल्मीकराव धावडे, जालिंदर पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रामदास फटाकडे यांनी केले.
फोटो १२ येळपणे उद्योजक
येळपणे येथे सन्मान सोहळ्याप्रसंगी एकत्र आलेले नवउद्योजक.