कान्हूरपठार येथे रंंगला बॉक्सिंगचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:26+5:302021-02-05T06:41:26+5:30
कान्हूरपठार : कान्हूरपठार (ता. पारनेर) येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बॉक्सिंगचा थरार पहिल्यादांंचाच अनुभवायला मिळाला. देशसेवा करत असलेल्या फौजी ...

कान्हूरपठार येथे रंंगला बॉक्सिंगचा थरार
कान्हूरपठार : कान्हूरपठार (ता. पारनेर) येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बॉक्सिंगचा थरार पहिल्यादांंचाच अनुभवायला मिळाला. देशसेवा करत असलेल्या फौजी ब्रदर्सच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये राष्ट्रीयस्तरावर खेळलेल्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.महिला गटात स्वप्नाली घोडके व आयरीत खान यांच्या नेत्रदीपक लढतीत स्वप्नाली घोडके हिने यश मिळविले. पुरुष गटामध्ये राहुल बुचुडे व रोहन गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीत राहुल गायकवाड यांनी यश मिळविले.
सुभेदार संपत ठुबे व धीरज जाधव यांच्यात झालेल्या लढतीमध्ये समान गुण मिळाल्याने सामना बरोबरीत सुटला. विजेत्या स्पर्धकांना फौजी ब्रदर्सच्या वतीने पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पंच म्हणून सुभेदार संपत ठुबे व मेजर सुभाष ठुबे यांनी काम पाहिले. अनिकेत ओव्हळ यांनी समालोचन केले तर विलास महाराज लोंढे यांनी प्रास्ताविक केले.
जीवनामध्ये खेळालाही अनन्यसाधरण महत्त्व आहे. शारीरिक क्षमतेबरोबरच व्यक्तींमधील इतर महत्त्वाच्या गुणांचाही विकास खेळामुळेच घडतो. खेळाकडे केवळ मनोरंजन व शारीरिक व्यायाम या दृष्टिकोनातून न पाहता खिलाडूवृत्ती, सांघिक वृत्ती, सहकार्य करण्याची भावना, नेतृत्व, स्पर्धात्मक कौशल्य, एकाग्रता, सहनशीलता मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हेच याचे फायदे आहेत, असे फाैजी ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी फौजी ब्रदर्स ग्रुपचे मेजर शिवाजी व्यवहारे, सुभाष ठुबे, हरिश्चंद्र व्यवहारे, विकी ठुबे, प्रशांत ठुबे, अंबादास ठुबे, नारायण ठुबे, भीमसेन ठुबे, संपत ठुबे, गणेश गायखे, भरत तांबे, एकनाथ नवले, शंकर ठुबे, रामदास ठुबे, भाऊसाहेब ठुबे, कैलास ठुबे, राजेंद्र सोनावळे, भाऊसाहेब गायखे, संतोष ठुबे, दादाभाऊ नवले, भास्कर नवले, हौशाभाऊ नवले, आनंदा भांबे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी : ३० बॉक्सिंग
कान्हूरपठार येथील बॉक्सिंग स्पर्धेतील महिला खेळाडूंमधील लढतीचा थरारक क्षण.