नगरमध्ये रंगला पतंग महोत्सव

By Admin | Updated: January 14, 2016 23:01 IST2016-01-14T22:37:33+5:302016-01-14T23:01:45+5:30

अहमदनगर : जैन ओसवाल युवक संघ व रोटरी क्लब आॅफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित उडान पतंग महोत्सवात आनंद चोपडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला़

Rang Kite Festival in the city | नगरमध्ये रंगला पतंग महोत्सव

नगरमध्ये रंगला पतंग महोत्सव

अहमदनगर : जैन ओसवाल युवक संघ व रोटरी क्लब आॅफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित उडान पतंग महोत्सवात ढील दे़़ ढील दे़़़चा नारा देत काटाकाटीच्या रंगलेल्या स्पर्धेत आनंद चोपडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला़ तर सुवेंद्र गांधी हे बेस्ट जोडीचे मानकरी ठरले़
क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत ४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला़ महोत्सवाचे उद्घाटन मर्चंट बँकेचे माजी संचालक अशोक पितळे, ललित गुंदेचा यांच्या हस्ते करण्यात आले़ या स्पर्धेत चायना मांजा वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला़ सर्व राऊंड नॉक आऊट पद्धतीने घेण्यात आले़ विजेत्यांना उद्योजक नरेंद्र फिरोदिया, मर्चंट बँकेचे संचालक अजित चंगेडिया यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले़ यावेळी रोटरी क्लबच्या आशाताई फिरोदिया, उमेश रेखी, विजय इंगळे, निर्मल गांधी, जैन ओसवाल युवक संघाचे अध्यक्ष सचिन डुंगरवाल, समीर बोरा, अक्षय बोरा, सुजित गुगळे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
आनंद चोपडा यांनी सर्वाधिक पतंग काटीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले़ यश भंडारी हे द्वितीय तर नितेश चोपडा व कैलास आहुजा यांनी तृतीय क्रमांक पटकावला़ स्पर्धेतील बेस्ट जोडीचे मानकरी सुवेंद्र गांधी व आश्विनी गांधी, बेस्ट पतंगचे मानकरी महेश बोरा, बेस्ट चक्रीचे मानकरी प्रितम गुगळे ठरले़ तर सुजल मालपाणी याला बालगटातील विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले़

Web Title: Rang Kite Festival in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.