वकील संघाच्या अध्यक्षपदी राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:05+5:302021-09-02T04:46:05+5:30
वकील संघाचे नवीन पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी मतदान झाले. ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. यामुळे कोण विजयी होणार याकडे कर्जत ...

वकील संघाच्या अध्यक्षपदी राणे
वकील संघाचे नवीन पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी मतदान झाले. ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. यामुळे कोण विजयी होणार याकडे कर्जत तालुक्याचे लक्ष लागले होते. अध्यक्षपदासाठी राणे, संदीप धोदाड व हरिश्चंद्र महामुनी यांच्यात तिरंगी लढत झाली. यामध्ये धनराज राणे यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी रेणूकर, दादासाहेब रगडे व दत्तात्रय कोरडे यांच्यात तिरंगी सामना झाला. यामध्ये सचिन रेणूकर यांनी बाजी मारली. त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सचिवपदासाठी संजीवन गायकवाड, हरिश्चंद्र राऊत व विनोद शिंगटे यांच्यात लढत झाली. यामध्ये संजीवन गायकवाड हे विजयी झाले. यामुळे त्यांची सचिवपदी निवड झाली. महिला सचिवपदी सुनीता बागल, तर ग्रंथालय सचिवपदी प्रवीण पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वरिष्ठ विधिज्ञ गोपाळराव कापसे यांनी काम पाहिले.