कर्जत वकील संघाच्या अध्यक्षपदी राणे, उपाध्यक्षपदी रेणुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:54+5:302021-09-02T04:46:54+5:30

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. गोपाळराव कापसे व ॲड. जालिंदर अनभुले यांनी काम पाहिले. निवडणुकीमध्ये एकूण तीन पॅनल ...

Rane as president and Renukar as vice president of Karjat Bar Association | कर्जत वकील संघाच्या अध्यक्षपदी राणे, उपाध्यक्षपदी रेणुकर

कर्जत वकील संघाच्या अध्यक्षपदी राणे, उपाध्यक्षपदी रेणुकर

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. गोपाळराव कापसे व ॲड. जालिंदर अनभुले यांनी काम पाहिले. निवडणुकीमध्ये एकूण तीन पॅनल होते. यात ज्येष्ठ वकील ॲड. रवींद्रनाथ भोसले, ॲड. भीमराव शेळके व ॲड. बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळविला. पॅनलमधील महिला सचिव ॲड. सुनीता बागल, खजिनदार ॲड. विनायक जाधव व ग्रंथालय सचिव ॲड. प्रवीण पवार यांची बिनविरोध निवड झाली होती.

उपाध्यक्षपदीही याच पॅनलचे अँड. सचिन रेणुकर विजयी झाले. मात्र प्रतिस्पर्धी पॅनलचे सचिव पदाचे उमेदवार ॲड. संजीवन गायकवाड यांचा अवघ्या एका मताने विजय झाला. निवडणूक योग्य रितीने पार पडण्यासाठी ॲड. दीपक भंडारी, अँड. नामदेव खरात, ॲड. सुरेश वाकडे, ॲड. नवनाथ फोंडे, अँड. विठ्ठलराव गवारे, ॲड. युवराज राजेभोसले, ॲड. दीपक भोसले, ॲड. राहुल जाधव, ॲड. गजेंद्र बागल, ॲड. अनिल म्हेत्रे, ॲड. संग्राम ढेरे, ॲड. नितीन जगताप, ॲड. आनंद साळवे, ॲड. भालचंद्र पिसे, अँड. संजय गवारे, ॲड. रामदास पुराणे, ॲड. अशोक कोठारी, ॲड. प्रतिभा रेणुकर आदींनी प्रयत्न केले.

निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आमदार रोहित पवार, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी कौतुक केले.

फोटो ०१ धनराज राणे, सचिन रेणुकर, संजीवन गायकवाड

Web Title: Rane as president and Renukar as vice president of Karjat Bar Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.