३-डी गेम्सच्या दुनियेत रमली बच्चे कंपनी
By Admin | Updated: May 24, 2016 23:41 IST2016-05-24T23:28:47+5:302016-05-24T23:41:31+5:30
अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच व माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ संचलित महेश बालभवन यांच्या संयुक्त विद्यमाने खास बाल विकास मंचच्या सदस्यांसाठी ३-डी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते.

३-डी गेम्सच्या दुनियेत रमली बच्चे कंपनी
अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच व माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ संचलित महेश बालभवन यांच्या संयुक्त विद्यमाने खास बाल विकास मंचच्या सदस्यांसाठी ३-डी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यातील तरुण शास्त्रज्ञ, टच मॅजीक्स कंपनीचे संस्थापक अनुप तापडिया यांनी तयार केलेले खेळ मॅजीक वॉल व फ्लोअरवर बच्चे कंपनीने केवळ हाताच्या व शरीराच्या हालचालींनी गेम्स खेळण्याची मजा लुटली.
यामध्ये मंकी जम्प, कार रेस, बास्केट बॉल, गोलकिपर, कोकोनट कॅच, फुटबॉल, चेस मॉनस्टर, अँग्री बलुन्स, फ्रूट डिफेन्डर, हंगरी पांडा यासारख्या विविध प्रकारच्या गेम्सची मजा मुलांनी लुटली. तसेच काही शैक्षणिक व स्मरणशक्ती वाढविणारे गेम्स यामध्ये होती. अशा प्रकारचे गेम्स मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, वैचारिक विकासासाठी फायदेशीर असल्याचे अनुप तापडिया यांनी सांगितले.
तसेच संध्याकाळी झालेल्या ‘संगणक केवळ खेळ नव्हे ज्ञानाचा खजिना’ या विषयावर मार्गदर्शन करताना तापडिया यांनी गेम्स कशी तयार होतात? मोठमोठ्या सर्च इंजिन्सचे काम कसे चालते? त्याचे सर्व्हर कसे असतात? इंटरनेट कसे काम करते, अशा विविध गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यामध्ये विद्यार्थ्यांनीही आपल्या विविध शंकांचे निरसन करून घेतले.
लोकमत बाल विकास मंचतर्फे पुढे अशाच विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून, बाल विकास मंचच्या सदस्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.