राम शिंदेही भाजपच्या पहिल्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:31 IST2019-10-01T16:30:46+5:302019-10-01T16:31:05+5:30
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना भाजपने कर्जत-जामखेड मतदारसंघातून पहिल्या यादीतच उमेदवारी जाहीर केली आहे.

राम शिंदेही भाजपच्या पहिल्या यादीत
अहमदनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना भाजपने कर्जत-जामखेड मतदारसंघातून पहिल्या यादीतच उमेदवारी जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत राम शिंदे यांना पुन्हा कॅबिनेटमंत्री देऊ, असे जाहीर करुन त्यांना प्रत्यक्ष उमेदवारीच जाहीर केली होती. शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. जामखेड-कर्जतमधून शिंदे भाजपच्या तिकिटावर दोनदा निवडून आले आहेत. आता त्यांना तिस-यांदा भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर राम शिंदे यांचा मंत्रीमंडळात सुरूवातीला राज्यमंत्री म्हणून समावेश झाला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली होती. राज्यात भाजपचे अनेक प्रमुख नेते उमेदवारीच्या वेटींगवर असताना फडणवीस यांनी शिंदे यांना पहिल्या यादीतच उमेदवारी देऊन बळ दिले आहे.