पोलिसातील राम और शाम

By Admin | Updated: June 20, 2014 00:37 IST2014-06-20T00:30:22+5:302014-06-20T00:37:30+5:30

प्रमोद आहेर, शिर्डी नोकरीच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले राम आणि शाम हे पोलीस अधिकारी योगायोगाने जिल्ह्यात प्रथमच एकत्र आले आहेत़

Ram and the evening in the police | पोलिसातील राम और शाम

पोलिसातील राम और शाम

प्रमोद आहेर, शिर्डी
नोकरीच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले राम आणि शाम हे पोलीस अधिकारी योगायोगाने जिल्ह्यात प्रथमच एकत्र आले आहेत़ जिल्हा पोलीस दलातील राम और शाम या बंधूंमध्ये लहानपणापासून एकप्रकारे सुरू असलेली स्पर्धा आजही संपलेली नाही़सध्या राम विखेंच्या, तर शाम थोरातांच्या कर्मभूमीत कर्तव्य बजावत आहे.
शामराव यादवराव सोमवंशी व रामराव माधवराव सोमंवशी ही सख्ख्या चुलत बंधूंची जोडी़ निफाड तालुक्यातील कोरमगाव या खेड्यातील हे दोघे बंधू वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत़ शेतकरी कुटुंबात असलेल्या या दोघा भावांनी गावात राहून शेतीच्या बांधावरून भांडत बसण्यापेक्षा शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धा केली़ दोघांनीही वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला़ शामरावने एमक़ॉम.पर्यंत मजल मारली, तर पाठोपाठ लहान असलेल्या रामरावनेही बीक़ॉम करुन कायद्याची पदवी मिळवली़
दरम्यान, शामरावने नाशिक गाठले व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन १९८९ मध्ये पोलीस दलात उपनिरीक्षक पद मिळवले़ पाठोपाठ रामरावनेही भावाचा कित्ता गिरवत नाशिक गाठले व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून १९९१ मध्ये उपनिरीक्षक पदाची वस्त्रे अंगावर चढवली़
यानंतर दोघांनाही यथावकाश बढत्या मिळत गेल्या़ एका ठिकाणावरुन दुसरीकडे, वेगवेगळ्या जिल्ह्यांत बदल्या होत गेल्या़ जबाबदाऱ्या व कामाच्या व्यस्ततेत एकत्र खेळत, बागडत, स्पर्धा करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचलेल्या राम और शाम या जोडीचा संपर्कही विरळ होत गेला़ मात्र तब्बल वीस-बावीस वर्षानंतर दोघांना प्रथमच एकाच जिल्ह्यात नियुक्ती मिळाली़
इथेही योगायोगाने व स्पर्धेने त्यांची पाठ सोडली नाही़ एकाच खात्यात राहून एकमेकांशी निकोप स्पर्धा करत इथवर पोहचलेल्या राम और शामलाही एकाच पक्षात राहुन मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असलेल्या दोन मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघात नियुक्ती मिळाली आहे़ सध्या रामराव कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डीत, तर शामराव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये सेवा बजावत आहेत़ आता कोणाचे ‘साहेब’ मुख्यमंत्री होतात याबाबत या दोन बंधूंमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: Ram and the evening in the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.