राळेगण सिद्धीत वाजले ‘आप’च्या विजयाचे फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:50 IST2020-02-12T15:46:35+5:302020-02-12T15:50:05+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले. विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली हे यश मिळविले. याबद्दल मंगवारी राळेगणसिद्धीत फटाके फोडून ग्रामस्थांनी जल्लोष केला.

राळेगण सिद्धीत वाजले ‘आप’च्या विजयाचे फटाके
पारनेर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले. विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली हे यश मिळविले. याबद्दल मंगवारी राळेगणसिद्धीत फटाके फोडून ग्रामस्थांनी जल्लोष केला.
याप्रसंगी माजी सरपंच जयसिंगराव मापारी, दत्ता आवारी, गणेश पठारे, रामहारी भोसले, सुभाष गाजरे व ग्रामस्थ. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनकाळात अरविंद केजरीवाल अनेकवेळा राळेगणसिद्धीत यायचे. त्यामुळे दिल्लीत मिळविलेल्या यशाचा अभिमान वाटतो, असे ग्रामस्थांनी सांगितले.