जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेवर राळेभात, जायभाय बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 00:56 IST2016-11-03T00:35:30+5:302016-11-03T00:56:40+5:30
जामखेड : अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत जामखेड तालुक्यातून सर्वसाधारण जागेसाठी सुधीर राळेभात

जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेवर राळेभात, जायभाय बिनविरोध
जामखेड : अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत जामखेड तालुक्यातून सर्वसाधारण जागेसाठी सुधीर राळेभात व अहमदनगर भटके विमुक्त मतदार संघातून सुभाष जायभाय यांची बिनविरोध निवड झाली.
हे दोघेही जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. तालुक्यातून प्रथमच दोन संचालक या संस्थेवर झाले आहेत. संस्थेच्या पंचवार्षिक व्यवस्थापन समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या बुधवारी अखेरच्या दिवशी जामखेड तालुक्यातील सर्वसाधारण जागेसाठी दोन अर्जांपैकी सुधीर राळेभात यांचा एकमेव अर्ज राहिला. त्यांचे प्रतिस्पर्धी जिल्हा बँकेचे माजी संचालक पांडुरंग सोले यांनी माघार घेतली. त्यामुळे राळेभात यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक अधिकाऱ्यांकडून याबाबतची औपचारिक घोषणा बाकी आहे. संस्थेच्या अहमदनगर जिल्हा गटातून भटके विमुक्त जागेसाठी जामखेड बाजार समितीचे संचालक सुभाष जायभाय यांचा एकमेव अर्ज राहिला. त्यामुळे जायभाय यांची बिनविरोध निवड झाली.
तालुक्यातून जायभाय व राळेभात यांची प्रथमच बिनविरोध निवड झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)