राहाता-जामखेडलाच निधी
By Admin | Updated: March 10, 2016 23:29 IST2016-03-10T23:09:28+5:302016-03-10T23:29:06+5:30
अहमदनगर: पालकमंत्री राम शिंदे व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मैत्रीची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे़ ही मैत्री आता निधीच्या रुपातही दिसू लागली आहे़

राहाता-जामखेडलाच निधी
अहमदनगर: पालकमंत्री राम शिंदे व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मैत्रीची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे़ ही मैत्री आता निधीच्या रुपातही दिसू लागली आहे़ सरकारची त्यांच्या मतदारसंघावरही चांगलीच कृपादृष्टी असून, विखे यांचे वर्चस्व असलेल्या राहाता नगरपालिकेला दोन कोटी तर शिंदे यांच्या जामखेड नगरपालिकेला ८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे़ नव्याने स्थापन झालेल्या अकोले, पारनेर, कर्जत, नेवासा, शेवगांव या पालिकांना मात्र अद्याप निधी मिळालेला नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे़ मात्र ही पालिका काबीज करण्यात शिंदे यांना अपयश आले़ शिंदे हे त्यांच्या जामखेड शहराच्या विकासासाठी आग्रही असतात़ नगरविकास विभागाच्या प्राथमिक सेवा सुविधा योजनेतून जामखेड नगरपालिकेला आठ कोटींचा निधी मिळाला आहे़ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही सरकार चांगलेच मेहेरबान झाले आहे़ विशेष रस्ते अनुदानातून विखे यांचे वर्चस्व असलेल्या राहाता नगरपालिकेला दोन कोटींचा घसघशीत निधी मिळाला आहे़ विधानसभेत परस्पर विरोधी भूमिका मांडणाऱ्या या दोन्ही नेत्यांवर नगरविकास खात्याची कृपादृष्टी झाली आहे़ विशेष म्हणजे हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे़ नगर महापालिकेला केवळ ७५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. भाजपाच्या सत्ता काळात प्रथमच एवढा मोठा निधी मिळाला असून, तो विखे व शिंदे यांच्या मतदारसंघासाठी मंजूर झाला आहे़ जिल्ह्यातील उर्वरित पालिकांना निधीची प्रतिक्षा आहे.
जामखेड नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आहे. शिंदे यांनी शहराच्या विकासासाठी हा निधी आणून विरोधकांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
असा मिळाला निधी
जामखेड नगरपालिका- ८ कोटी
राहाता नगरपालिका- 0२ कोटी
ागर महापालिका- ७५ लाख
सरकारने हा विशेष निधी जाहीर केला आहे. या निधीचे प्रस्ताव जिल्हास्तरावरुन गेलेले नाहीत.
राहाता पालिकेला या निधीतून रस्त्यांची कामे करता येणार आहेत. तर जामखेड पालिकेला इमारतीसाठी हा निधी मिळाला आहे.