शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणावर पावसाची विश्रांती; नदीपात्रातून आवक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 11:51 IST

गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़

राहुरी : गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा २५ हजार ७४० दशलक्ष घनफुटावर स्थिरावला आहे़  धरणात पाण्याची पातळी १ हजार ८११़५५ फुटावर आहे़ मुळा धरण ९८़९९ टक्के भरले आहे़ सध्याचा पाणीसाठा स्थिर ठेऊन दोन्ही कालवे व मुळा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ उपयुक्त पाणीसाठा २१२३८ दशलक्ष घनफूट इतका आहे़ गेल्या वर्षी मुळा धरणात २४ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा जमा झाला होता़  याशिवाय १९०० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडण्यात आले होते़गेल्या वर्षी मुळा धरणातून शेतीसाठी दोन आवर्तन मिळाले होते़ नदीपात्रातील बंधाºयामध्ये पाणी शिल्लक न राहिल्याने मुळा काठाला हादरा बसला होता़  यंदा दोन्ही कालव्यातून चार आवर्तन मिळणार आहेत़ नदीपात्रातून ३ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले आहे़ डाव्या कालव्यातून ४० क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़ उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाण्याचे शेतीसाठी आवर्तन सुरू आहे.आतापर्यंत मुळानगर येथे ४३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळानगर परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे़ कोतूळ येथे यंदाच्या पावसाळ्यात ८४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने सरासरी ओलांडली आहे़ गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दोन्ही कालव्याव्दारे शेतीसाठी ऐन पावसाळ्यात आवर्तन सुरू आहे़ शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ पोळ्यानंतर रब्बीच्या पेरण्यांना वेग येतो़ मात्र सध्या रब्बीच्या पेरण्यांना वेग नाही.मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून ४० क्युसेकने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शेतक-यांनी मागणी केलेली नाही़ त्यामुळे डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला नाही़ शेतकºयांनी मागणी केल्यास विसर्ग वाढविला जाईल़, असे मुळा धरण अभियंता रवींद्र आंधळे यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीDamधरण