नगर जिल्ह्यात पावसाचा मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:11+5:302021-03-24T04:18:11+5:30
विजेच्या कडकडाटासह बुधवारपर्यंत नगर जिल्ह्यात पाऊस तुरळक ठिकाणी पडणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात गारपीटसह ...

नगर जिल्ह्यात पावसाचा मुक्काम
विजेच्या कडकडाटासह बुधवारपर्यंत नगर जिल्ह्यात पाऊस तुरळक ठिकाणी पडणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोंगणी केलेला गहू, हरभरा सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आंधळे यांनी केले आहे.
अवकाळी पावसामुळे गहू ,हरभरा, द्राक्ष आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पाऊस कधी थांबतो याकडे लक्ष वेधले आहे. पडलेल्या पावसामुळे पिकाच्या भावावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
....
दोन दिवसात पडलेला पाऊस
मुळा धरण पाणलोटात दोन दिवसात चांगला पाऊस झाला. वडाळा -३०, मुळानगर २५, राहुरी १०, कासार पिंपळगाव १०, अमरापूर २० मिली मीटर अशी पावसाची नोंद झाली आहे.
...