शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मुळा धरणावर पाऊस रूसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 17:43 IST

दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पाऊस रूसल्याने शेतक-यांचे लक्ष पाण्याच्या पातळीकडे वेधले आहे.  लाभक्षेत्रावर पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून धरणात पिण्यायोग्य पाणी केवळ २६७ दलघफु इतका आहे. 

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पाऊस रूसल्याने शेतक-यांचे लक्ष पाण्याच्या पातळीकडे वेधले आहे.  लाभक्षेत्रावर पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून धरणात पिण्यायोग्य पाणी केवळ २६७ दलघफु इतका आहे. २६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ४ हजार ८६८ दलघफु पाणी साठा आहे. त्यापैकी ४ हजार ५०० दलघफु पाणीसाठा मृत आहे. परवा कोतुळ येथे १० मिली पावसाची नोंद झाली. धरणाकडे पाण्याची आवक सुरू होण्यासाठी पाणलोट क्षेत्रावर जोरदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्याने नव्याने पाण्याची आवक सुरू झालेली नाही. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने आंगठा दाखविला असला तरी लाभ क्षेत्रावर पावसाने सुरूवात केली आहे. त्यामुळे पेरण्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.  नेवासा, राहुरी, वडाळा, खडका आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. याउलट शिरसागाव, कु काणा, दहेगाव आदी भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे श्ोतक-यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे.‘‘मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्याने नव्याने पाण्याची आवक सुरू होऊ शकलेली नाही. नजीकच्या काळात धरणावर पावसाची हजेरी अपेक्षीत आहे. मात्र लाभ क्षेत्रावर पावसाने ब-यापैकी हजेरी लावली आहे. लाभक्षेत्रावर ६० मिली पाऊस पडला आहे. नजिकच्या काळात पाऊस आणखी सक्रीय होण्याची अपेक्षा आहे़ धरणात पिण्यायोग्य २६७ दलघफु पाणी साठा उपलब्ध आहे.’’- रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर‘‘शेतातील पीके यंदा जोमदार आहेत. ऊसाचे क्षेत्र समाधानकारक आहे. मात्र मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावलेली नाही. ऊसाचे भवितव्य मुळा धरणाच्या पाण्यावर अवलंबुन आहे. यंदा मुळा धरण पुर्ण क्षमतेने भरले तरच शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. मुळा डावा कालव्याखाली असलेल्या मुसळवाडी तलावात केवळ २० टक्के पाणी साठा आहे.’ - अनिल इंगळे, शेतकरी

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी