शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोटात पाऊस सुरूच : मुळा धरण भरण्याच्या मार्गावर; नदीपात्रात पाणी सोडण्याची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 21:01 IST

मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने मुळा धरणात रविवारी (२३ आॅगस्ट) संध्याकाळी  २२ हजार ८१२ दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद झाली आहे. यामुळे धरण ८८ टक्के भरले आहे. दरम्यान धरणातून नदीपात्रातून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे.

 राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने मुळा धरणात रविवारी (२३ आॅगस्ट) संध्याकाळी  २२ हजार ८१२ दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद झाली आहे. यामुळे धरण ८८ टक्के भरले आहे. दरम्यान धरणातून नदीपात्रातून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे.

२६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या धरणात सध्या २३ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणात ६ हजार २६० क्युसेकने आवक सुरू आहे. 

रविवारी पाणलोट व लाभक्षेत्रावर सूर्यदर्शन झाले. पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पावसाने हजेरी लावली. मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी गेटची सर्विसिंग करण्यात आली. लवकरच गेटच्या परिसरात लाइटिंग यंत्रणा  कार्यान्वयित करण्यात येणार आहे. मुळा धरणावरील सायन दुरुस्ती करण्यात आली.  नदीकाठी  असणा-या नागरिकांना लवकरच सावधानतेचा इशारा देण्यात येणार  आहे. 

मुळा धरणात  २५ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर जिल्हाधिकारी व तहसीलदारांना पाटबंधारे खात्याच्या त्याच्या वतीने इशारा पत्र देण्यात येणार आहे. २५ हजार ४००  दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्याचा नियम आहे. २८ आॅगस्ट दरम्यान तांत्रिकदृष्ट्या मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. 

       

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणWaterपाणीRainपाऊस