जामखेड : आमदार रोहित पवार यांनी साकत (ता. जामखेड) पंचायत समिती गणासाठी बुधवारी घेतलेल्या जनता दरबारात विविध तक्रारींचा पाऊस घडला. अनेकांनी वैयक्तिक व सार्वजनिक समस्या मांडल्या. पवार यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक समस्यांची सोडवणूक केली.
आमदार आपल्या दारी, साकत ग्रामपंचायतीने महसूल, पंचायत समिती, कृषी, महावितरण, भूमिअभिलेख व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंच आपल्या दारी हा उपक्रम सरपंच हनुमंत पाटील यांनी आयोजित केला होता. यावेळी जनता दरबार झाला. या कार्यक्रमासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, कृषी अधिकारी सुधीर शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, भूमी अभिलेख अधिकारी मनीषा धीवर, महावितरणचे प्रभाकर गावीत, तलाठी सचिन खेत्रे, ग्रामसेवक राजेंद्र वळेकर आदी उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले, नागरिकांनी वैयक्तिक तसेच ग्रामपंचायतीने अनेक समस्या मांडल्या. या सर्व समस्या जाग्यावरच सोडविण्यात आल्या. सार्वजनिक विकासाबाबतच्या काही समस्या जिल्हा व राज्य पातळीवरील असून त्या सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन निराकारण करण्यात येईल. सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी चकरा माराव्या लागतात. अधिकारी भेटत नाहीत. अडचणी येतात. या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती व्हावी यासाठी गणनिहाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
---
या कोरोना योद्धांचा सन्मान..
यावेळी साकत ग्रामपंचायतीने कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले. यामधे तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, आरोग्य अधिकारी सुनील बोराडे, तलाठी सचिन खेत्रे, ग्रामसेवक राजेंद्र वळेकर, डॉ. सुनील वराट, डॉ. अजय वराट, पोलीस पाटील महादेव वराट, पत्रकार सुदाम वराट, बाळासाहेब वराट, समुदाय आरोग्य अधिकारी प्रशांत पाखरे, आरोग्य सेवक मुबारक शेख, सेविका मंदा शिंदे, शांतीताई शिरोळे, छाया वराट, मनीषा सानप, ज्योती लहाने आदींचा समावेश आहे.
----
२१ जामखेड पवार
साकत येथील जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकून घेताना आमदार रोहित पवार.