शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

शेवगावात पाच रेशन दुकानांवर छापा; शिल्लक धान्यसाठ्यात तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 11:22 IST

जिल्हा पुरवठा अधिका-यांनी शहरातील पाच स्वस्त धान्य दुकानात अचानक छापा टाकून तपासणी केली. या दुकानांमध्ये शिल्लक साठ्यामध्ये तफावत आढळून आली. याप्रकरणी संबंधित दुकानदारांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

शेवगाव : नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा पुरवठा अधिका-यांनी शहरातील पाच स्वस्त धान्य दुकानात अचानक छापा टाकून तपासणी केली. या दुकानांमध्ये शिल्लक साठ्यामध्ये तफावत आढळून आली. याप्रकरणी संबंधित दुकानदारांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांत शासनाने मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे. मोफत धान्य वाटपातील गहू, तांदूळ वाटपावरून अनेकांनी जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हा पुरवठा शाखा यांचेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी २४ एप्रिल रोजी अचानक शेवगाव शहरात दाखल होत, स्वस्त धान्य दुकानांवर छापे टाकले. तेथे मोफत वाटप करण्यात येणा-या गहू व तांदूळ शिल्लक साठ्यात मोठी तफावत आढळून आली होती. संबंधितांना माळी यांनी यासंदर्भात खुलासा सादर करण्याचे आदेश देत शहरातील पाच दुकानांना सील ठोकले होते. ही कारवाई पंचांच्या समक्ष करण्यात आली होती. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नायब तहसिलदार मयूर बेरड यांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश माळी यांनी दिले. त्यानुसार बेरड यांनी फिर्यादी होऊन सोमवारी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.         स्वस्त धान्य दुकान क्रमांक २, ३, ६, ८, १० या दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये रंजना प्रकाश सुतार, अंबादास नामदेव खंडागळे, डी. बी. बिहाणी, पी.एच. गजभीव, बाबासाहेब नाईक, प्रितम नाईक, श्यामसुंदर धुत, गोपाळ धुत, संदीप मुरलीधर धुत, ओमप्रकाश गणपत कवडे, प्रकाश एच. गजभीव सर्व राहणार शेवगाव यांना आरोपी करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव