शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोतूळमध्ये अवैध दारू अड्ड्यांवर छापा; चार आरोपी अटक : ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 19:41 IST

कोतुळ परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्यानंतर मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारू विक्री करणा-या अड्ड्यांवर छापे टाकले. यात चार जणांना अटक करून ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कोतुळ : गेल्या काही महिन्यांपासून कोतुळ परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्यानंतर मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारू विक्री करणा-या अड्ड्यांवर छापे टाकले. यात चार जणांना अटक करून ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सध्या कोतुळ परिसरात अवैध देशी दारूची विक्रीची साखळी निर्माण झाली आहे. यात अनेक जणांचे हात गुंतले आहेत. त्यातून मिळणा-या अफाट पैशातून गुंडगिरी देखील फोफावली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविल्यानंतर सामाजिक संघटना, महिला कार्यकर्त्यांनी अवैध दारूविरोधी लढ्यात उडी घेतली. पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या तक्रारीवरून कोतुळच्या इंदिरानगर परिसरात योगेश मोहिते व बसस्थानक परिसरात राजेंद्र खरात यांना देशी दारूच्या बाटल्या विकताना छापा टाकून पकडण्यात आले. त्यांच्याकडून पंचवीस लिटर देशी संत्रा व पंचवीस लिटर बॉबी देशी दारूसह दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. या जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ८१ हजार ९९५ रूपये आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. डी. परदेशी, दुय्यम निरीक्षक एन. सी. परते, डी. डी. चौरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

दोन लाखांहून अधिक किंमतीची दारू जप्त

गेल्या दोन महिन्यात दोन लाखांहून अधिक रूपयांची अवैध देशी दारू पकडल्याने इथे हा गोरख धंदा किती फोफावला आहे, हे उघड झाले आहे. दारूबंदी समितीचे हेरंब कुलकर्णी यांच्या मंत्रालयात पर्यंतच्या पाठपुराव्यामुळे उत्पादन शुल्क खाते खडबडून जागे झाले आहे. मात्र ब्राह्मणवाडा, पिंपळगाव खांड , बेलापूर, चास, पिंपळदरी गावात देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले