पाथर्डी तालुक्यात गांजाच्या शेतावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:54+5:302020-12-11T04:46:54+5:30

पाथर्डी : तालुक्यातील एकनाथवाडी शिवारातील डोंगरेवस्ती येथील शेतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात ६२ किलो गांजा जप्त करण्यात ...

Raid on cannabis field in Pathardi taluka | पाथर्डी तालुक्यात गांजाच्या शेतावर छापा

पाथर्डी तालुक्यात गांजाच्या शेतावर छापा

पाथर्डी : तालुक्यातील एकनाथवाडी शिवारातील डोंगरेवस्ती येथील शेतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात ६२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

एकनाथवाडी शिवारामध्ये काही जण शेतामध्ये गांजाची झाडे लावून राज्यात मोठ्या प्रमाणावर गांजा पुरवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास एकनाथवाडीतील डोंगरे वस्ती येथील विष्णू अनिल डोंगरे, बाळासाहेब भानुदास खेडकर, शहादेव रावसाहेब खेडकर यांच्या राहत्या घरी, तसेच शेतावर छापा टाकला. यावेळी ६ लाख २३ हजार ४४० रुपयांचा ६२ किलो ३४५ ग्रॅम वजनाचा सुका गांजा व शेतात उभी असलेली गांजाची झाडे जप्त केली.

पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी दोघांना अटक करण्यात आली.

फोटो १० एकनाथवाडी

पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे पोलिसांनी जप्त केलेली गांजाची झाडे.

Web Title: Raid on cannabis field in Pathardi taluka