राहुरी, श्रीरामपूर बसस्थानक प्रमुखांचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 21:31 IST2020-05-11T21:26:52+5:302020-05-11T21:31:25+5:30
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : स्टीलची वाहतूक करणाºया मालमोटारीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील राहुरी, श्रीरामपूर बसस्थानक प्रमुखांचा जागीच मृत्यू झाला. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील प्रभात डेअरी जवळ सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला.

राहुरी, श्रीरामपूर बसस्थानक प्रमुखांचा अपघातात मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : स्टीलची वाहतूक करणाºया मालमोटारीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील राहुरी, श्रीरामपूर बसस्थानक प्रमुखांचा जागीच मृत्यू झाला. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील प्रभात डेअरी जवळ सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला.
अनिल यशवंत निकम (वय ५०. रा. देर्डे-कोºहाळे, ता. कोपरगाव) व बाळासाहेब यशवंत कोते (वय ५७ रा. शिर्डी, ता. राहाता) अशी मृतांची नावे आहेत. निकम हे राहुरीचे तर कोते हे श्रीरामपूर बसस्थानकाचे प्रमुख होते.
अनिल निकम व बाळासाहेब कोते हे सोमवारी सायंकाळी श्रीरामपूर एसटी आगारातील काम आटोपून बाभळेश्वरमार्गे शिर्डीकडे एका दुचाकीहून चालले होते. संगमनेर रस्त्यावरील माहेश्वरी स्टीलसमोर अचानक आलेल्या स्टीलच्या सळ्या भरलेल्या मालमोटारीला पाठीमागून त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तेथे मोठी गर्दी जमली होती. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस, आगार प्रमुख राकेश शिवदे, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना येथील साखर कामगार रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी रवींद्र जगधने यांनी पोलिसांना सांगितले.