राहुरी व नेवासात कडकडीत बंद, नगर- मनमाड राज्यमार्गावर ओतले दूध
By Admin | Updated: June 1, 2017 14:42 IST2017-06-01T14:42:44+5:302017-06-01T14:42:44+5:30
नगर-मनमाड महामार्र्गावर पहाटेपासून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

राहुरी व नेवासात कडकडीत बंद, नगर- मनमाड राज्यमार्गावर ओतले दूध
आ नलाइन लोकमत राहुरी / नेवासा (अहमदनगर) दि. १नगर-मनमाड महामार्र्गावर पहाटेपासून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. १० ते १२ टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले आहे. तसेच टॉमेटो, बटाटे रत्यावर फेकून दिले. राहुरीच्या आठवडे बाजारात शुकशुकाट दिसून आला. अनेक शेतक-यांनी आठवडे बाजारात भाजीपाला घेऊन येण्याचे टाळले. नेवासा तालुक्यातील शेतक-यांनी संपामध्ये सहभाग घेतला आहे. नेवासाफाटा येथील आठवडे बाजार शेतक-यांनी मोडला. आठवडे बाजार सकाळी आठ वाजता मांडायला सुरुवात होताच शेतक-यांची घेतली बाजारतळावर धाव घेत संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहीमेत पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे, सोपान पंडीत, राजू कर्डक, रमेश सावंत यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.