श्रीगोंद्यात राहुलची सुनामी लाट
By Admin | Updated: September 27, 2014 00:14 IST2014-09-27T00:01:29+5:302014-09-27T00:14:42+5:30
श्रीगोंदा : बबनराव पाचपुते भाजपात गेल्याने मोदींची लाट संपली आहे. मात्र पाचपुते म्हणतात मोदींची सुप्त लाट आहे. परंतु श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांची सुनामी लाट आली आहे.

श्रीगोंद्यात राहुलची सुनामी लाट
श्रीगोंदा : बबनराव पाचपुते भाजपात गेल्याने मोदींची लाट संपली आहे. मात्र पाचपुते म्हणतात मोदींची सुप्त लाट आहे. परंतु श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांची सुनामी लाट आली आहे. या लाटेत पाचपुतेंची सत्ता नेस्तनाबूत होणार आहे, असा विश्वास जि.प.चे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केला.
सुरुवातीला राहुल जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राहुल जगतापांची श्रीगोंदा शहरातून सवाद्य मिरवणूक काढली. त्यानंतर माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचारसभा झाली.
शेलार पुढे म्हणाले की, आघाडीचा उमेदवार ठरविताना सुरुवातीपासून सावध भूमिका घेतली. शेवट सावधगिरीने करावयाचा आहे. पाचपुतेंनी निवडणुकीत नेहमीच नुरा कुस्ती करून सत्ता टिकविली. परंतू श्रीगोंद्यात शिवाजीराव नागवडेंच्या नेतृत्वाखाली पाचपुतेंचा धक्का देणार आहोत. यावेळी सचिन जगताप, कमल सावंत, हरिदास शिर्के, बाळासाहेब गिरमकर, प्रा.तुकाराम दरेकर, डी.एम. भालेराव, प्रशांत दरेकर, अॅड.सुभाष डांगे, गणेश बेरड, केशव बेरड, पांडुरंग उगले यांची भाषणे झाली.
यावेळी कुंडलिकराव जगताप, रंगनाथ निमसे, बाळासाहेब उगले, दादा औटी, अॅड.सुनील भोस यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन रंगनाथ बिबे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)