जेल फोडून फरार आरोपी राहुल गोयकरचा कर्जतमध्ये खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 11:51 IST2018-11-22T11:50:58+5:302018-11-22T11:51:03+5:30
जेल फोडून फरार असलेला गुन्हेगार राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात काल रात्री खून झाला.

जेल फोडून फरार आरोपी राहुल गोयकरचा कर्जतमध्ये खून
कर्जत : जेल फोडून फरार असलेला गुन्हेगार राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात काल रात्री खून झाला. जुन्या वादातून बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खून झाल्याचे पोलीसांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील खेड येथील जेलमधून फरार झाला होता.
कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात जुन्या वादातून राहुल देवराव गोयकर याचा लाकडी दांडक्याने मारहाण करत खून करण्यात आला. असून याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले आहे.