कोंभाळणे येथील राहीबाई पोपेरे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 14:23 IST2018-04-03T14:22:45+5:302018-04-03T14:23:50+5:30
‘बियाणे बँक ’ बनविणा-या दुर्गम आदिवासी भागातील कोंभाळणे येथील राहीबाई सोमा पोपेरे यांना कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

कोंभाळणे येथील राहीबाई पोपेरे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
अकोले : आईच्या ममतेने दुर्मिळ पारंपरिक गावरान वाणांच्या बियाणांचे जतन करुन त्याची ‘बियाणे बँक ’ बनविणा-या दुर्गम आदिवासी भागातील कोंभाळणे येथील राहीबाई सोमा पोपेरे यांना कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
तालुक्यातील सेंद्रीय शेती करणा-या तमाम शेतक-यांमध्ये त्या ‘राहीमावशी’ नावाने परिचित आहेत. शनिवारी अहमदनगरमध्ये आयोजित ‘कृषी महोत्सव २०१८’ मध्ये पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. राहीबाईंनी आपल्या राहत्या घरात कोंभाळणेसारख्या छोट्या खेडे गावात पारंपरिक गावरान वाणांची बियाणे बँक ‘बायफ’ या सेवाभावी संस्थेच्या मदतीने सुरू केलेली आहे. या बँकेतून त्यांनी आत्तापर्यंत हजारो गरजू होतकरू शेतक-यांना गावरान देशी वाणांचा पुरवठा केलेला आहे. त्यांच्याकडे सुमारे ५३ पिकांचे ११४ गावरान वाण शास्त्रशुध्द पध्दतीने जतन करण्यात आलेले आहेत. गावरान बियाणे संवर्धन प्रचार व प्रसार या मध्ये केलेल्या भरीव कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी ‘लोकमत’ समुहाने देखील राहीबार्इंना सन्मानीत केले होते.