जप्तीस गेलेल्या तहसीलच्या पथकास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 18:35 IST2017-08-19T18:35:07+5:302017-08-19T18:35:24+5:30
जंगम मालमत्ता जप्तीच्या कारवाईसाठी गेलेल्या राहाता तहसील कार्यालयाच्या पथकास शुक्रवारी शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्तीस गेलेल्या तहसीलच्या पथकास धक्काबुक्की
ठळक मुद्देपुणतांब्यातील प्रकार : नायब तहसीलदारांची फिर्याद
र हाता : जंगम मालमत्ता जप्तीच्या कारवाईसाठी गेलेल्या राहाता तहसील कार्यालयाच्या पथकास शुक्रवारी शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहाता तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार राहुल कोताडे (वय ३५) यांनी याबाबत राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पुणतांबा येथे प्रभाकर रघुनाथ नवले, बबलू उर्फ विक्रम प्रभाकर नवले, शिवराज उर्फ स्वप्निल प्रभाकर नवले यांच्या पुणंतांबा येथील राहत्या घरी राहाता तहसील कार्यालयाच्या कर्मचाºयांचे पथक जंगम मालमत्ता जप्तीच्या कारवाईसाठी गेले होते. १८ आॅगस्टला सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान हे महसूल पथक गेले असता आरोपींनी सरकारी कामात अडथळा आणून तहसीलच्या कर्मचाºयांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच धमकी दिली. याबाबत फौजदार विशाल वाठोरे तपास करीत आहेत.