मुळा उजव्या कालव्यातून पाणी सोडले
By Admin | Updated: October 27, 2016 00:50 IST2016-10-27T00:31:29+5:302016-10-27T00:50:47+5:30
राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून बुधवारी सायंकाळी पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़

मुळा उजव्या कालव्यातून पाणी सोडले
राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून बुधवारी सायंकाळी पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ६५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे़ सध्या धरणात २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे़ भेंडा व सोनईसाठी पिण्याचे पाणी सोडण्यात आले आहे़ मुळा धरणाकडे पाण्याची आवक बंद झाली आहे़ त्यामुळे नदीपात्रातील विसर्ग गेल्या आठवड्यात बंद केला़