मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोटात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:24+5:302021-07-23T04:14:24+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दाेन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी (दि.२२) ...

Radish, collapse in the catchment area of Bhandardara dam | मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोटात कोसळधार

मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोटात कोसळधार

अहमदनगर : जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दाेन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी (दि.२२) सायंकाळी संपलेल्या चोवीस तासात धरणांच्या पाणलोटात तब्बल आठ इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे तीनही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा, निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला. घाटघर, रतनवाडी आणि पांजरे येथे आठ इंचाहून अधिक पाऊस पडला. भंडारदरा येथेही सुमारे आठ इंच पाऊस झाला. कळसुबाई परिसरातून वाहणाऱ्या कृष्णावंती नदीच्या विसर्गात मोठी वाढ झाल्याने वाकी येथील ११२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत असून, या तलावावरून ११२ क्युसेकने पाणी निळवंडे धरणाच्या दिशेने झेपावत आहे.

गुरुवारी सायंकाळी संपलेल्या ३६ तासांत भंडारदरा धरणात १ टीएमसीपेक्षा अधिक म्हणजेच १ हजार ७१ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठा ६ हजार ४५९ दशलक्ष घनफूट इतका वाढला. निळवंडे धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी सहा वाजता १ हजार ७७० दशलक्ष घनफूट इतका नोंदविला गेला होता.

राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरणाकडे १० हजार ३४२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ नोंदवली गेली. गुरुवारी ११ हजार ३८६ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली असून, ४४ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे यंदा मुळा धरण शंभर टक्के भरेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

.................

धरण पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

मुळा ११ हजार ३८६

भंडारदरा ६ हजार २३९

निळवंडे १ हजार ७७०

कुकडी ९ हजार ८९०

..................

भंडारदरा पाणलोटातील पाऊस (मिमीमध्ये)

घाटघर २१२

पांजरे २१०

रतनवाडी २०७

भंडारदरा १९०

वाकी १६० मिमी

..............

गोदावरीतील विसर्ग बंद

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी (दि. २२) सकाळी १० वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात ६ हजार ३१० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. दुपारी १२ वाजता हा विसर्ग बंद करून गोदावरीच्या डाव्या कालव्यात २०० क्युसेक व उजव्या कालव्यात ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

Web Title: Radish, collapse in the catchment area of Bhandardara dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.