बाल, सखींसाठी रेडिओ सिटी खाऊ गल्ली
By Admin | Updated: June 2, 2014 00:37 IST2014-06-02T00:27:30+5:302014-06-02T00:37:51+5:30
अहमदनगर : बालविकास मंच व सखी मंचतर्फे विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, शैक्षणिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
बाल, सखींसाठी रेडिओ सिटी खाऊ गल्ली
अहमदनगर : बालविकास मंच व सखी मंचतर्फे विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, शैक्षणिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून ‘खाऊ गल्ली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत बालविकास मंच, सखी मंच आणि एफएम बोले तो रेडिओ सिटी ९१.१ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकातील बिझनेस सेंटर येथे दिनांक ३ जून रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे. आपल्या शहरातील आपल्या आवडत्या खाऊ गल्लीत (वडा पाव, पावभाजी, भेळ, सॅन्डविच, पाणीपुरी) मध्ये आपल्या फेव्हरेट ठिकाणी आपल्या अहमदनगरमध्ये. या कार्यक्रमामध्ये आर.जे. चैत्राली सोबत विविध फनीगेम्सद्वारे भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अधिक माहितीकरीता लोकमत भवन, सावेडी रोड, पत्रकार चौक, मो.क्र. ९९६०५६९०६३ येथे संपर्क साधावा.