मुळा पाटबंधारे उपविभागीय कार्यालय जाळले
By Admin | Updated: March 27, 2017 16:11 IST2017-03-27T16:11:29+5:302017-03-27T16:11:29+5:30
नेवासा तालुक्यातील घोडेगाव व चिलेखनवाडी येथील मुळा उजवा कालवा पाटबंधारेचे उपविभागीय कार्यालय रविवारी रात्री जाळण्यात आले

मुळा पाटबंधारे उपविभागीय कार्यालय जाळले
घोडेगाव (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील घोडेगाव व चिलेखनवाडी येथील मुळा उजवा कालवा पाटबंधारेचे उपविभागीय कार्यालय रविवारी रात्री जाळण्यात आले आहे़ याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आलेली नाही़
शेतीसाठी चारीचे पाणी घेतलेल्या शेतकºयांना पोलिसांनी जबर मारहाण केली होती़ त्यानंतर पाटबंधारे विभागाने त्याच शेतकºयांवर गुन्हे दाखल केले होते़ त्यामुळे या संतप्त शेतकºयांनीच या कार्यालयांना आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे़ रविवारी रात्री घोडेगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला दोन अज्ञान इसमांनी आग लावली़ रात्रपाळीचे रखवालदार नाना वैरागर , बाबासाहेब भासार यांनी तातडीने पाणी टाकून आग विझवली़ मात्र, तोपर्यंत कार्यालयातील काही कागदपत्र, वायरींग व दरवाजे काही प्रमाणात जळून कार्यालयाचे नुकसान झाले़ रखवादार वैरागर व भासार यांनी उपअभियंता अशोक साळुंके यांना माहिती दिली़ साळुंके यांनी फोन करुन पोलीस हवालदार गणेश साठे यांना याबाबत कळविले़ त्यांनी तातडीने पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले़ मात्र, तोपर्यंत जाळपोळ करणारे पसार झाले होते व आगही विझविण्यात आली होती़
जाळपोळीचा तिसºयांदा प्रकार -
मुळा वसाहतीमध्ये कार्यालय जाळण्याचा हा प्रकार तिसºयांदा घडला आहे. पहिला प्रकार : उपअभियंता सोनवणे यांच्या काळात रेकॉर्ड रूम जाळण्याचा प्रकार घडला होता़
दुसरा प्रकार : घोडेगाव येथे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी आंदोलन केले होते़ पाटबंधारे विभागाने त्यावेळी आडमुठेपणाचे धोरण घेतल्यानंतर शेतकºयांनी कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न केला होता़
तिसरा प्रकार : रविवारी रात्री मुख्य कार्यालयाच्या दोन दरवाजांवर बाटलीतून पेट्रोल टाकून कार्यालय पेटवून देण्यात आले़