प्रश्नांतून संशोधनाची खरी सुरुवात होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:57+5:302021-09-19T04:21:57+5:30
संगमनेर : प्रश्नांतून संशोधनाची खरी सुरुवात होते. प्रश्न पडल्याशिवाय कोणतीही नवनिर्मिती अशक्य आहे. संशोधकाने, शिक्षकाने सतत जिज्ञासा जिवंत ठेवावी. ...

प्रश्नांतून संशोधनाची खरी सुरुवात होते
संगमनेर : प्रश्नांतून संशोधनाची खरी सुरुवात होते. प्रश्न पडल्याशिवाय कोणतीही नवनिर्मिती अशक्य आहे. संशोधकाने, शिक्षकाने सतत जिज्ञासा जिवंत ठेवावी. त्यामुळे मानवी जीवनातील जटिल समस्यांवर उपाय शोधता येणे सहज शक्य आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले.
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त आयोजित ‘संशोधन कसे, का आणि केव्हा?’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा. ए. के. मिश्रा, डॉ. एम. आर. वाकचौरे आणि ई ॲण्ड टी. सी. विभागाच्या प्रमुख डॉ. आर. पी. लबडे, आदी यावेळी उपस्थित होते.
एकविसाव्या शतकात दिवसागणिक नवनवीन बदलांना सामोरे जाताना आर्टिफिशअल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, मशीन लर्निंग तंत्रज्ञान शिकून घेऊन त्यात संशोधन करावयास शिक्षक व विद्यार्थी यांनी सजग व्हावे, असेही डॉ. अभ्यंकर म्हणाले. सूत्रसंचालन समन्वयक डॉ. सतीष जोंधळे यांनी केले. सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. विलास शिंदे यांनी आभार मानले.