प्रा. पोपटराव औटी प्रदेश सचिवपदी
By | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:50+5:302020-12-07T04:14:50+5:30
भातकुडगाव : राष्ट्रीय शिक्षक संचेतना राष्ट्रीय कार्यकारिणीद्वारे प्रदेश सचिवपदी प्रा. पोपटराव औटी यांची नुकतीच निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष ...

प्रा. पोपटराव औटी प्रदेश सचिवपदी
भातकुडगाव : राष्ट्रीय शिक्षक संचेतना राष्ट्रीय कार्यकारिणीद्वारे प्रदेश सचिवपदी प्रा. पोपटराव औटी यांची नुकतीच निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष ब्रजकिशोर शर्मा, डॉ. शैलेंद्र शर्मा, हरेराम वाजपेयी, डॉ. शहाबुद्दीन शेख, डॉ. प्रभू चौधरी आदी राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या सहमतीने प्रदेश प्रभारी यांच्या हस्ते प्रा. पोपटराव औटी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. औटी हे शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या भातकुडगाव महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. औटी यांच्या निवडीचे संस्थाध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, सभापती डॉ. क्षितिज घुले, पं. स. माजी सदस्य भास्कर शिंदे, प्रा. नंदकुमार शेळके, सरपंच राजेश फटांगरे, मुकुंद जमधडे, दादासाहेब दळवी आदींनी स्वागत केले.
फोटो : ०६ पोपटराव औटी