प्रा. किरण लद्दे यांना नाट्यशास्त्रात पीएच. डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:48+5:302021-03-13T04:37:48+5:30
कोपरगाव : नाट्य प्रशिक्षक प्रा. किरण दीपक लद्दे यांनी ‘स्वातंत्र्योत्तर मराठी रंगभूमी : दिग्दर्शनाचे बदलते तंत्र’ या विषयावर ...

प्रा. किरण लद्दे यांना नाट्यशास्त्रात पीएच. डी.
कोपरगाव : नाट्य प्रशिक्षक प्रा. किरण दीपक लद्दे यांनी ‘स्वातंत्र्योत्तर मराठी रंगभूमी : दिग्दर्शनाचे बदलते तंत्र’ या विषयावर संशोधन करून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे शोध प्रबंध सादर करून त्यांना नाट्यशास्त्र विषयात पीएच. डी. प्रदान करण्यात आली.
प्रा. डॉ. लद्दे यांना या संशोधन कार्यात शिवाजी विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभागप्रमुख स्व. एन. व्ही. चिटणीस व मराठी विभागप्रमुख व प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संशोधन कार्यात आई ज्योती, वडील दीपक, पत्नी स्नेहल लद्दे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता आण्णासाहेब तिरमखे, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुधीर डागा, डॉ. मयूर तिरमखे, लेखक अमेय दक्षिणदास, प्रसाद बेडेकर, यतीन माझिरे, डॉ. आस्था तिरमखे, गणेश सपकाळ, रोहित शिंदे, चेतन गवळी व सर्व नाट्यकलावंतांनी त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले.
............