नवनागापूरमध्ये शिवसेनेला धक्का; बबन डोंगरे-दत्ता सप्रे यांच्या गटाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:38 IST2021-01-18T13:37:10+5:302021-01-18T13:38:27+5:30
अहमदनगर शहरालगत असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. येथे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकून बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे.

नवनागापूरमध्ये शिवसेनेला धक्का; बबन डोंगरे-दत्ता सप्रे यांच्या गटाचे वर्चस्व
अहमदनगर : शहरालगत असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. येथे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकून बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे.
मागील वेळी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे बंडू सप्रे यांनी वर्चस्व मिळविले होते. यावेळी बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. महापौर बाबासाहेब वाकळे यांचे दत्ता सप्रे हे व्याही आहेत. व्याह्यांसाठी महापौर वाकळे हे ही मैदानात उतरले होते. तर सेनेकडून माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह पदाधिकारी या निवडणूक सक्रीय होते.
बबन डोंगरे-दत्ता सप्रे यांनी निवडणूक एकत्र निवडणूक लढविल्याचा फायदा झाला. यामुळे त्यांच्या गटाला १३ जागा मिळाल्या. बंडू यांना ४ जागांवरच समाधान मानावे लागले.