वाणाचा माऩ़सुगडं अन् साडीची खरेदी

By Admin | Updated: January 13, 2016 23:48 IST2016-01-13T23:39:41+5:302016-01-13T23:48:34+5:30

अहमदनगर : नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठ सजली आह़े़

Purchase of Manasudadan and Sari of Vaana | वाणाचा माऩ़सुगडं अन् साडीची खरेदी

वाणाचा माऩ़सुगडं अन् साडीची खरेदी

अहमदनगर : नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठ सजली आह़े़ बुधवारी साडी, सुगड, वाण, तीळगूळ आणि भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती़
संक्रांतीत महिला वर्गाचा खरेदीचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो़ ओवसायला जाताना नवीन साडी तर हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांनी एकमेकींना वाण देण्याची प्रथा रुढ आहे़ त्यामुळे साडी आणि वाण घेताना महिला विशेष खबरदारी घेताना दिसल्या़ गुरुवारी भोगी असल्याने या दिवशी बनविण्यात येणाऱ्या विशेष भाजीसाठी (खेंगट) महिलांनी गावरांन बोरांसह, ऊस, बिब्याची फुले, हरभरा, भुईमुगाच्या शेंगा, वांगी, बाजरीचे पीठ आदी वस्तुंची खरेदी केली़
संक्रांतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात वाढ झाली आहे़ तीळगुळाचे दर मात्र, ‘जैसे थे’च आहेत़ बाजारात साखरेचे तीळगूळ, काटेरी तीळगूळ, खसखसी तीळगूळ, बडीशेपचे तीळगूळ, चुरमुऱ्याचे तीळगूळ, लवंग तीळगूळ, कलिंग तीळगूळ, दालचिनी तीळगूळ, मोत्याचे तीळगूळ, अशा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी तीळगुळांनी वातावरणात गोडवा निर्माण झाला आहे.
वाणासाठी फॅन्सी वस्तू
संक्रांतीनिमित्त घरोघरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होतो़ या कार्यक्रमाला आमंत्रित केल्या जाणाऱ्या महिलांना वाण म्हणजेचे एखादी उपयोगी पडणारी वस्तू भेट म्हणून देण्याची प्रथा आहे़ ही प्रथा आजही आवडीने जोपासली जाते़ काळानुरुप भेटवस्तू देण्यातही मोठा बदल झाला आहे़ आरसा, प्लास्टिकचे डबे, छोट्या वाट्या, चमचे, कुंकवाचा करंडा, बांगड्या, टिकल्यांची पाकिटे यासह मोबाईलचे कव्हर, गॅस लायटर, ब्रेसलेट, आकर्षक रुमाल, शोपीस, रेसीपी बूक आदी वस्तू दिल्या जातात़ बाजारात वाणासाठी आलेल्या फॅन्सी वस्तू खरेदी करण्याकडे महिलांचा कल दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)
संक्रांतीत तीळगुळाला मोठे महत्त्व असते़ एकमेकांना गोड वस्तू देण्याची प्रथा आहे़ त्यामुळे घरोघरी तीळगुळाची खरेदी केली जाते़ यंदा या वस्तुंचे दर वाढलेले नाहीत़ त्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़ नगर शहरात अनेक ठिकाणी तीळ, गुळाचे पदार्थ बनविले जातात़ नगरच्या तीळगुळास संक्रांतीनिमित्त बाहेरील जिल्ह्यातूनही मोठी मागणी असते़
-रोहित राठोड, विक्रेते
संक्रांतीच्या आधी दोन दिवस सुगडाच्या खणांची मोठी विक्री होते़ तीन, चार दिवसांत या विक्रीतून बऱ्यापैकी पैसे मिळतात़ शहरात मातीचे सुगड बनविणे शक्य नसल्याने बाहेरुन आणून आम्ही याची विक्री करतो.ज्येष्ठ महिला दरवर्षी आवर्जून खणांची खरेदी करतात़ -नानीबाई शिंदे, विक्रेत्या
मातीचे सुगड संक्रांतीनिमित्त मंदिरात ओवसायला जाताना मातीच्या सुगडातून ववसा नेला जातो़ त्यामुळे प्रत्येक महिला या सणाला सुगडांची खरेदी करतात़ बाजारात गेल्या आठ दिवसांपासून सुगड विक्रीसाठी आले आहेत़ ३० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत सुगडाखा खण आहे़

Web Title: Purchase of Manasudadan and Sari of Vaana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.