कोविड सेंटरमधील रुग्णांना पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:20 IST2021-04-22T04:20:21+5:302021-04-22T04:20:21+5:30
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वत: उपस्थित राहून रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस केली. शिर्डीच्या दृष्टीने रामनवमी उत्सवाचे महत्त्व खूप ...

कोविड सेंटरमधील रुग्णांना पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वत: उपस्थित राहून रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस केली.
शिर्डीच्या दृष्टीने रामनवमी उत्सवाचे महत्त्व खूप मोठे आहे. कोविड संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी शिर्डीतील रामनवमी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागला आहे. या उत्सवाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन विखे पाटील परिवाराने कोविड केअर सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांना पुरणपोळी आणि आमरसाचा प्रसाद देऊन या उत्सवाचा आनंद व्दिगुणित केला.
डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. प्रितम वडगावकर, डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. घोगरे यांच्यासह स्थानिक नगरसेवक याप्रसंगी उपस्थित होते.
या दरम्यान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारणा करतानाच आरोग्याबाबत सूचनाही केल्या. उपस्थित वैद्यकीय अधिकारी व महसूल विभागाला कोविड सेंटरमधील अधिकच्या बेडची संख्या वाढविण्याबाबत तसेच इतर आरोग्य सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली.