कुत्र्याचे पिलू चोरून मारले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:17 IST2020-12-26T04:17:46+5:302020-12-26T04:17:46+5:30

याप्रकरणी हॉटेलचे मालक साहिल राजेंद्र गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र राजेंद्र वैराट (रा. फुटका तलाव, सोमवार पेठ, सातारा), याच्याविरोधात ...

The puppy was stolen and killed | कुत्र्याचे पिलू चोरून मारले ठार

कुत्र्याचे पिलू चोरून मारले ठार

याप्रकरणी हॉटेलचे मालक साहिल राजेंद्र गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र राजेंद्र वैराट (रा. फुटका तलाव, सोमवार पेठ, सातारा), याच्याविरोधात चोरी व कुत्र्याला ठार मारल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैराट हा २३ डिसेंबर रोजी मित्रांसमवेत शिर्डी येथे जात असताना तो नारायण गव्हाण येथील महिंद्रा हॉटेलवर थांबला होता. जाताना त्याने हॉटेलमधील कुत्र्याचे पिलू चोरून नेले. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्यानंतर वैराट याची ही चोरी निदर्शनास आली. याबाबत गाडेकर यांनी सुपा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी वैराट याच्याशी संपर्क करून चोरलेले पिलू आणून देण्याचे सांगितले. वैराट याने चोरलेले पिलू हॉटेलजवळ सोडले. मात्र, त्याचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या पिलाचे पारनेर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले. या गुन्ह्यात आरोपी वैराट याला अटक केली जाणार असल्याचे तपासी अधिकारी तथा हेडकॉस्टेबल पठाण यांनी सांगितले.

Web Title: The puppy was stolen and killed