विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST2021-02-26T04:27:39+5:302021-02-26T04:27:39+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परिसरातील नागरिकांनी मास्क लावावे. सुरक्षित अंतर पाळावे अशा सूचना देत दुकाने, हॉटेल, विविध व्यावसायिकांमध्ये ग्रामपंचायत ...

Punitive action against unmasked citizens | विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परिसरातील नागरिकांनी मास्क लावावे. सुरक्षित अंतर पाळावे अशा सूचना देत दुकाने, हॉटेल, विविध व्यावसायिकांमध्ये ग्रामपंचायत घारगाव यांचेकडून जनजागृती करण्यात आली आहे. मात्र तरीही मास्क न लावता लोक फिरत आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून प्रवास करणाऱ्या, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आंबीखालसा फाटा, घारगाव, बोटा येथे पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत, मुख्य हवालदार आदिनाथ गांधले, गणेश लोंढे, सुरेश टकले, राजेंद्र लांघे, राजू खेडकर, संतोष खैरे, विशाल कर्पे, किशोर लाड, गणेश तळपाडे, नारायण ढोकरे, पंढरीनाथ पुजारी, भारत गांजवे, संजय मंडलिक, अरविंद गिरी, उमेश गव्हाणे, कैलास ठोंबरे आदी सहभागी होते.

...............

नियमांचे पालन करा

पठारभागातील गावांचे घारगाव हे मुख्य बाजारपेठेचे केंद्र आहे. यामुळे येथे नेहमीच गर्दी होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने घारगाव ग्रामपंचायतने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना मास्क लावणे, साबणाने हात वारंवार स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दी टाळणे यांसह सर्वच नियमांचे पालन करण्याबाबतचे आवाहन केले आहे. अन्यथा, नियम मोडणार्‍यांवर सक्तीने कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: Punitive action against unmasked citizens