५२ जणांवर दंडात्मक कारवाई

By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:15+5:302020-12-05T04:38:15+5:30

कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण ...

Punitive action against 52 persons | ५२ जणांवर दंडात्मक कारवाई

५२ जणांवर दंडात्मक कारवाई

कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात तालुका पोलिसांनी शुक्रवारी (दि.४ डिसेंबर) ५२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये विनामास्क फिरणारे ३७, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणारे ७ व विनाकागदपत्रे, लायसन्सविना दुचाकी चालविणाऱ्या ८, अशा एकूण ५२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ६ हजार रुपये दंडाची वसुली केली आहे. सदरची कारवाई कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Web Title: Punitive action against 52 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.