महिला वाहकास शिवीगाळ करणाऱ्या आरोपींना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST2021-03-04T04:38:55+5:302021-03-04T04:38:55+5:30
अरविंद योसेफ कांबळे (वय २२), बापू चंद्रभान चव्हाण (वय २७ रा. दोघे शहर टाकळी ता. शेवगाव) व समीर बबन ...

महिला वाहकास शिवीगाळ करणाऱ्या आरोपींना शिक्षा
अरविंद योसेफ कांबळे (वय २२), बापू चंद्रभान चव्हाण (वय २७ रा. दोघे शहर टाकळी ता. शेवगाव) व समीर बबन सय्यद (वय २७, रा.आंत्रे ता. नेवासा) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या गुन्ह्यात एसटी बस वाहक प्रमिला आश्रुबा पालवे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद केली होती. पालवे या बसमध्ये कार्यरत असताना १८ जून २०१४ रोजी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे प्रवासी घेण्यासाठी बस थांबली होती. यावेळी रिक्षातून उतरून काही प्रवासी बसमध्ये बसले. याचाच आरोपींना यांना राग येऊन त्यांनी पालवे यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. या गुन्ह्याचे शेवगाव पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. समोर आलेले साक्षी, पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. जी.के. मुळे यांनी काम पाहिले.