३१ जानेवारीला जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:38+5:302021-02-05T06:38:38+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात ३१ जानेवारीला (रविवार) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. नगर जिल्ह्यात पाच वर्षांपर्यंत वयोगटातील ...

Pulse polio campaign in the district on 31st January | ३१ जानेवारीला जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम

३१ जानेवारीला जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम

अहमदनगर : जिल्ह्यात ३१ जानेवारीला (रविवार) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. नगर जिल्ह्यात पाच वर्षांपर्यंत वयोगटातील सुमारे साडेचार लाख बालकांना लस देण्यात येणार असून, त्यासाठी चार हजार बूथवर नऊ हजार कर्मचारी मोहिमेत सहभागी होणार आहेत.

ग्रामीण भागात तीन लाख ७७ हजार ३५८, शहरी भागात १६ हजार ६६९ व महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्‍ये ४६ हजार २६० असे एकूण जिल्ह्यात चार लाख ४० हजार २८७ बालकांना डोस पाजण्‍यात येणार आहे. यासाठी एकूण तीन हजार ९८२ बूथवर एकूण नऊ हजार ११० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यस्तरावरून अहमदनगर जिल्ह्याकरिता सहा लाख दहा हजार डोस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

आपल्‍या ० ते ५ वर्षे वयाच्‍या बालकांना यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरी या मोहिमेमध्ये पुन्हा पोलिओ डोस घेऊन राष्‍ट्रीय पल्‍स पोलिओ लसीकरण मोहीम १०० टक्‍के यशस्‍वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्‍यक्ष प्रताप शेळके, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे यांनी केले आहे.

---------

जिल्‍ह्यात १०३ ट्रांझिट टीमद्वारे बस स्‍टँड, रेल्‍वे स्‍टेशन, धार्मिक स्‍थळे, आदी ठिकाणी व १३१ मोबाईल टीमद्वारे ऊसतोड कामगार, भटके लोक, रस्‍त्‍यावरील मजुरी करणाऱ्या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्‍यात येणार आहेत.

-----------

Web Title: Pulse polio campaign in the district on 31st January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.