१७ महाराष्ट्र बटालियनच्या छात्रसैनिकांकडून पल्स पोलिओ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:14+5:302021-02-05T06:38:14+5:30

३१ जानेवारी २०२१ रोजी पल्स पोलिओ मोहिमेमध्ये कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय व पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड या दोन ...

Pulse Polio Campaign by 17 Maharashtra Battalion students | १७ महाराष्ट्र बटालियनच्या छात्रसैनिकांकडून पल्स पोलिओ अभियान

१७ महाराष्ट्र बटालियनच्या छात्रसैनिकांकडून पल्स पोलिओ अभियान

३१ जानेवारी २०२१ रोजी पल्स पोलिओ मोहिमेमध्ये कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय व पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड या दोन महाविद्यालयांनी सहभाग घेऊन बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, वेगवेगळ्या वस्त्या आदी ठिकाणी जाऊन पल्स पोलिओ अभियान राबविणाऱ्या वर्कर, अंगणवाडी सेविका व तसेच, पल्स पोलिओ आरोग्य पथकास मदत केली. या मोहिमेमध्ये दादा पाटील महाविद्यालयातील ९० व बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील ४२ छात्रसैनिकांनी सहभाग नोंदवला. या छात्रसैनिकांना मेजर संजय चौधरी, लेफ्टनंट अजय कुमार पालवे यांनी मार्गदर्शन केले. मोहीम राबविण्यासाठी प्रा. किसन सूळ यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमाबद्दल ब्रिगेडियर एम. एम. विटेकर, कर्नल जीवन झेंडे, ॲडम ऑफिसर विनय बाली, सुबेदार मेजर लोकंदर सिंग यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.

-------

फोटो- ०१एनसीसी

दादा पाटील महाविद्यालयातील एनसीसीच्या छात्रांनी पल्स पोलिओ मोहिमेत सहभाग घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत केली.

Web Title: Pulse Polio Campaign by 17 Maharashtra Battalion students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.