समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST2021-09-02T04:44:44+5:302021-09-02T04:44:44+5:30
कोपरगाव : राष्ट्रीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. २०-२१ ...

समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन
कोपरगाव : राष्ट्रीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. २०-२१ या वर्षी समताच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या प्रावीण्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून ‘समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन यांच्या हस्ते करण्यात आले.
कोयटे म्हणाले, खेळामुळे आरोग्य सुदृढ बनते त्यामुळे समता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विविध क्रीडा प्रकारच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य सुदृढ बनविण्याचे प्रयत्न समता करत आहे. त्यामुळे समताच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात यश संपादन करून समताचे नाव महाराष्ट्रात नावारूपाला आणून महाराष्ट्राच्या बाहेर ही प्रावीण्य मिळवून समताचा झेंडा फडकविला आहे. समताच्या विद्यार्थ्यांनी समता पॅटर्ननुसार दहावी, बारावीच्या परीक्षेमध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यात यश संपादन केले असून क्रीडा क्षेत्रातही समता स्कूलचे विद्यार्थी यश संपादन करीत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य समीर अत्तार यांनी केले. समता स्कूलच्या एल. के.जी. आणि यूकेजीतील विद्यार्थी समता स्कूलमध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहिले. आभार क्रीडा शिक्षक रोहित महाले यांनी मानले.
...................
फोटो ओळी :
समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन करताना काका कोयटे, स्वाती कोयटे, संदीप कोयटे, लिसा बर्धन यांच्या हस्ते करण्यात आले.
..............
फोटो ३१- समता विशेषांक प्रकाशन - कोपरगाव
310821\img-20210829-wa0010.jpg
फोटो३१- समता विशेषांक प्रकाशन - कोपरगाव