शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

नेवासा शहरात जनता कर्फ्यूने शुकशुकाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 18:16 IST

नेवासा शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे आठ दिवसाच्या जनता कर्फ्युला रविवारी (९ आॅगस्ट) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शहरात शुकशुकाट जाणवत होता.

नेवासा  : शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे आठ दिवसाच्या जनता कर्फ्युला रविवारी (९ आॅगस्ट) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शहरात शुकशुकाट जाणवत होता.

    नेवासा शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे.  शहरातील विविध भागात कोरोनाने आपला विळखा घातला आहे. शहरात रविवारपासून सुरू केलेल्या जनता कर्फ्युला व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने पहिल्या दिवशी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.   मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व व्यापाºयांनी देखील आपले व्यवसाय बंद ठेवल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. शहरातून जाणाºया श्रीरामपूर-नेवासा फाटा रस्त्याने तुरळक वाहने दिसत होती.

नेवासा तालुक्यात २६ नवीन रुग्ण आढळले असून रुग्ण संख्या ३६७ वर गेली आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नेवासा शहरातील नऊ, सोनई येथील पाच, घोडेगाव येथील तीन, उस्थळ दुमाला येथील पाच, सलाबतपूर येथील एक, खेडलेकाजळी येथील दोन व भेंडा बुद्रुक येथील एकाचा समावेश आहे. रविवारपर्यंत तालुक्यातील २३४ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. आठ कोरोना बाधीत व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १२५ रुग्ण उपचार घेत आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाcorona virusकोरोना वायरस बातम्या